Surprise Me!

Marathi Actor Subodh Bhave's Viral Post | 'यांनाही कळतं' म्हणत सुबोधचा नेटकऱ्यांना महत्त्वाचा संदेश

2021-09-20 0 Dailymotion

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आलेत. सरकारने दिलेल्या नियमाचे सर्वांनाच कटाक्षाने पालन करावे लागत आहे. तरीही काही जण हे नियम पाळताना दिसत नाहियेत. दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे याने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केलाय. हा फोटो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे. कारण हा फोटोही तितकाच खास आहे. या फोटोमध्ये एका माकडाने तोंडाला मास्क लावल्याचं दिसून येतयं. याला कॅप्शन देत सुबोधनं 'यांनाही कळतं' असं म्हंटलं आहे. या कॅप्शनने सर्वानांच विचार करायला भाग पाडलंय. हा फोटो पाहून प्राण्यांनाही कळतं पण माणसांना कधी कळणार असं तुम्हालाही वाटेलच.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचेही संकेत देण्यात येत आहेत. पण सध्यातरी अनेकांना हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचा विसर पडलेला दिसून येतोय. त्यामुळे अनेक कलाकारही त्यांच्या प्रेक्षकांना नियमावलीचं पालन करण्यास सांगत आहेत. पण कोणीही फार लक्ष देताना दिसत नाही. मात्र आता सुबोधने केलेल्या या पोस्टने सर्वांचचं लक्ष वेधून घेतलयं. (Snehal VO)<br /><br />#SubodhBhaveNewViralPost #SubodhNewBhave #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon